IMPIMP
Managing NCP's state president is not as easy as rearing chickens, Sharad Pawar's internal Managing NCP's state president is not as easy as rearing chickens, Sharad Pawar's internal

“राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पं नाही”, राष्ट्रवादीतील अंतर्गत शितयुद्ध चव्हाट्यावर

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मागील काही दिवसानंतर अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहे. नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन सोहळ्यात रोहित पवारांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर नाव न घेता टिका केली. त्यानंतर शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यावरून सोशल मीडियावर देखईल जयंत पाटील आणि रोहित पवार समर्थक एकमेकांत भिडल्याचे दिसून आले.

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ? 

रावेर मतदारसंघात श्रीराम पाटलांनी चांगली लढत दिली. मात्र, संघटनेतकडून आवश्यक ती ताकद न मिळाल्यानं त्यांना यश आलं नाही. यासोबतच या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं नाही असं म्हणत रोहित पवारांनी रोहिणी खडसे यांच्यावर नाव न घेता टिका केली. तर रोहित पवारांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींनी जयंत पाटलांना बदलण्याची भाषा केली.

हेही वाचा..“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर

निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्यावर आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी. तसेच, सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे. असे ट्विट विकास लवांडे यांनी केलं. त्यावर जयंत पाटलांनी देखील खदखद व्यक्त करत आपणही पुढील दोन ते तीन महिने अध्यक्ष असून त्यानंतर संघटनेची जबाबदारी कुणाला द्यायची ती द्या. अशी भावना व्यक्त केली.

तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांभाळणे कोंबड्या पाळण्याइतके सोप्पे नाहीये. असं ट्विट जयंत पाटील यांचे समर्थक अॅड. भूषण राऊत यांनी केलं. त्यांचा रोख हा रोहित पवारांकडेच होता. कारण रोहित पवार हे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून पोल्ट्रीचाही व्यवसाय चालवतात. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शितयुद्ध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा..शपथविधी झाला, खातेवाटपही झालं, आता पहिलं अधिवेशन २४ जूनपासून.. वादळी ठरणार ?

हेही वाचा..“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला 

हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्…