अहमदनगर : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला. तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
दरम्यान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यानंतर आज दसऱ्याचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
एका व्यक्तिमुळे आपलं नुकसान झालं असं सांगतानाच फडणवीस यांची प्रवृत्ती हम करे सो कायदा अशीच असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. फडणवीसांची प्रवृत्ती हम करे सो कायदाच होती. त्यांनी स्वत:चे निर्णय लादण्याचं काम पक्षात केलं. सामूहिक निर्णय प्रक्रियेला तिलांजली दिली, अशी टीकाही त्यांनी केली.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी प्रवेश केल्यानंतर आज दसऱ्याचा मुहूर्त साधत राष्ट्रवादी कार्यालयात भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसे दाखल होताच फटाके फोडून फुलांची उधळण करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले होते.पण अद्याप मोठे स्वागत बाकी आहे असे खडसे कार्यकर्त्यांना म्हणाले त्यांच्या या बोलण्यावरून त्यांना कोणतेतरी मोठे पद मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
Read Also ;
नारायण राणे यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या? हे दुर्दैवी : अर्जुन खोतकर https://t.co/zq4jjtU1EF @miarjunkhotkar @ShivSena @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020