मराठा आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यानंतर मराठा बांधवांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. ही नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले आहे. दरम्यान सुनावणी थोड्यावेळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
थोड्या वेळासाठी ही सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्याची मागणी आहे. आज ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुरू करण्यात आली. त्यातच महाराष्ट्र सरकारचे वकील मुकूल रोहतगी हेही गैरहजर आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने थोड्यावेळासाठी ही सुनावणी तहकूब केली.
याचिकाकर्त्यांकडून पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे याची सुनावणीसाठी परवानगी देण्यात आली होती. तरीही हे प्रकरण आज तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सुनावणीसाठी आले