पुणे : मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असणार आहे. मात्र यावेळी OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षण समाजाने दिलेल्या बंदला ‘वंचित’चा पाठींबा असणार आहे. अशी माहिती वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकारपरिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही फटकारले. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्ये वेगवेगळ गट निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
Read Also
विखेंच्या ‘या’ सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे येणार एकत्रhttps://t.co/d90FVGp8xx#VikhePatil #PMModi #CMThackarey #Shivsena #BJP@drsujayvikhe @RVikhePatil @PMOIndia @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020