IMPIMP
Marathon meeting of BJP from 08 to 01 night, what happened in the meeting? Marathon meeting of BJP from 08 to 01 night, what happened in the meeting?

भाजपची रात्री ०८ ते ०१ पर्यंत मॅरेथॉन बैठक, भाजपने घेतला मोठा निर्णय ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती यासाठी भाजपची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीतील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

काल शुक्रवारी सायंकाळी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. ही बैठक रात्री ८ ते १ वाजेपर्यंत चालली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा..“भाजपच्या सर्व्हेमुळे आमचा खेळ झाला”, महायुतीतील बड्या नेत्याचा आरोप, महायुतीत राजकीय युद्ध 

या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. मोदीजी संविधान बदलणार, आदिवासी समाजाला सांगितलं की तुमचे सर्व हक्क काढून घेतली. महिलांना खटाखट पैसे देण्याचाही खोटा प्रचार महाविकास आघाडीने केला.

हेही वाचा..राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय 

आज या बैठकीत लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण केले. आमच्या काय चुका आहेत ? त्यावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमच्या सरकारकडून लोकांची मागणी पुर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. लोकांच्या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. असेही ते म्हणाले.

तसेच आता विधान परिषदेतील ११ जागांबाबत निवडणूक होणार आहे. त्यावरही आम्ही चर्चा केली. आम्हाला मिळालेल्या जागांच्या उमेदवारीवर चर्चा केली. आम्ही काही नाव ठरवली आहेत. ती नाव केंद्राला पाठवणार आहे, त्या नावांवर केंद्रात चर्चा करून अंतिम निर्णय होणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केलं.

READ ALSO :

हेही वाचा..“आरक्षण देतांना कोणाच्या ताटातलं काढून देऊ नये, ही ठाकरे गटाची भूमिका” 

हेही वाचा..दोन तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय काय झाले ? उपोषणकर्त्यांना आज मंत्री भेटणार 

हेही वाचा..खेडमधून अतुल देशमुखांची उमेदवारी निश्चित; ‘मविआ’च्या मुंगसे, काळे यांचा पत्ता कट!

हेही वाचा..“मी ९ मंत्री पाडणार, १३ तारखेला सांगतो,” मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा 

हेही वाचा…अटल सेतूवर पडल्या लांबच लांब भेगा, नाना पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश 

Leave a Reply