औरंगाबाद – राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. 1 डिसेंबरला त्यासाठी मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्येच खरी लढत पाहायला मिळणार असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मेष्टा संघटना आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. भाजपचे शिरीष बोराळकर आणि प्रवीण घुगे यांच्यात आधीपासूनच रस्सीखेच सुरु होती. त्यात आता माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनीही या स्पर्धेत उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपकडून पदवीधरचे तिकीट कुणाला मिळणारं यावरून उत्सुकता वाढली आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप उमेदवारात होणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात ‘सहविचार सभा’ घेण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपकडून शिरीष बोराळकर यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.
Read Also –
मागासवर्गीय विद्यार्थ्यांबरोबर आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ
मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांकडून नोटीसा