मुंबई – महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. काल (६ नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत, त्यांच्याकडे उमेदवारांची यादी सोपवली आहे.
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी 4 नावांची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून एकनाथ खडसे यांना अपेक्षेनुसार उमेदवारी मिळाली आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत कोणते स्थान मिळेल? कोणते पद मिळेल यांच्याकडे सगळयांचे लक्ष लागले होते. एकनाथ खडसे यांचे नाव समाजसेवा आणि सहकार या पदासाठी सुचवण्यात आले आहे.
तसेच राष्ट्रवादी कडून एकनाथ खडसेंबरोबरच राजू शेट्टी, यशपाल भिंगे, आनंद शिंदे यांचे नवे देखील यादीत आहेत.राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी दिल्याने या नावाची सध्या विशेष चर्चा सुरू आहे. त्यांच्या गायनामुळे त्यांना कला हे पद देण्यात येणार आहे. तसेच सतत शेतकऱ्यांच्या मदतीस धावणारे ष्ट्करी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना देखील सहकार आणि समाजसेवा या पदावर नेमण्याचे राष्ट्रवादीकडून सुचवण्यात आले आहे
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही नावे फेटाळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी बोलताना राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा देखील महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केली आहे.
Read also –
“राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते यादी नाकारणार नाही”
अखेर यादी समोर आली! महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी ‘या’ 12 नावांचा प्रस्ताव
राजस्थान, ओडिशा, सिक्कीम, दिल्लीनंतर कर्नाटक सरकारचीही फटक्यांवर बंदी