पिंपरी चिंचवड : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संसदेत कामगार कायदे पास केल्याने आता त्यावरून गदारोळ होत आहे. अनेक कामगार संघटनांनी मोदी सरकारच्या या निर्णयाविरोधात आता आंदोलन छेडलं आहे. असच यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात कामगार संघटनानी पुकारलेल्या आंदोलनाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी हजेरी लावली आहे.
आज कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनात उपमहापौर केशव घोळवे यांनी सहभाग नोंदवून या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी केल्याने आता भारतीय जनता पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता याला पक्षांतर्गत संघर्ष कि उपमहापौर घोळवे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय याविषयी तर्क लावले जात आहेत.
पिंपरी परिसरातील कामगार संघटनांनी आयोजित केलेल्या या आंदोलनात भाजपच्याच उपमहापौरांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केल्यामुळे महापालिका क्षेत्रात राजकीय भूकंप झाला असून अनेक राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उपमहापौर केशव घोळवे यांच्या या मोदींविरोधातील आंदोलनाला महाराष्ट्र भाजप कशा पद्धतीने उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
Read Also :
शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप
पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय
‘पाच वर्ष आंब्याच्या झाडाखाली बसून आंबे खाणाऱ्यांवर आज बाभळीच्या झाडाखाली बसण्याची वेळ’