मुंबई : वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर आणि कुटूंबियांनी वरळीतील एसआरए प्रकल्पातून उभ्या झालेल्या एका इमारतीत तळमजल्यावर बेकायदेशीररित्या कार्यालय थाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
Mayor Kishori Pednekar captured illegally Residential Flat in Building No 2 & Office (Kis Corporate Services) in Bldg 1 of Gomata Janata SRA Society Worli Flat alloted to Slum Rehab Person & Office alloted to Gomata SRA Housing Society Office This SRA project now belongs to BMC pic.twitter.com/JGR1J2lUX3
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 12, 2020
माझ्याकडे याबाबतची सगळे कागदपत्रे आहेत त्यामुळे आता मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापौरांवर कारवाई करावी असं चॅलेंज किरीट सोमय्या यांनी दिले आहे. किशोरी पेडणेकर आणि त्यांचे पती किशोर पेडणेकर यांच्या नावे असलेल्या ‘किश कॉर्पोरेट सर्व्हीस’ या कंपनीने संपूर्ण तळमजला हडप केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मात्र दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळले आहेत. भाजपने हवेत आरोप करू नये. त्यांनी आरोप सिद्ध करावेत. हवी ती शिक्षा भोगेन. चुकीचे आरोप करू नका. एका महिलेवर आरोप करताना लाज वाटत नाही का?, अशा शब्दात पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे.