राजस्थानमध्ये सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य रंगल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली आहे . त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसची चाचपणी केली. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात जवळपास तासभर बैठक झाली.
राजस्थानमध्ये काँग्रेस अंतर्गत सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चाचपणी सुरु केली आहे. महाविकासाआघाडी सरकारला फटका बसू नये यासाठी काँग्रेसची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.या बैठकीला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यावरुन वाद निर्माण झाला होता.
यानंतर आधी चर्चा-मग बदल्या असे सूत्र महाविकासआघाडीत ठरले आहे. त्यानुसार बदल्या करण्याआधी महाविकासआघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजीचे मुद्दे मांडले होते.