राज्यात दुधाची दरवाढ करण्यासाठी राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने देखील दूध दरवाढीसाठी आक्रमक होत आंदोलन सुरू केले आहे. माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या कार्यकर्ते व शेतकर्यांसोबत अमरावतीतील मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथे आंदोलन केले.
मुख्यमंत्री जागे व्हा, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा.@BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis @OfficeofUT pic.twitter.com/MjAEeKeyuq
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) August 13, 2020
यावेळी अनिल बोंडे यांनी धाला 30 रुपये भाव, 10 रुपये अनुदान व दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे भाजपचे 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तिसरे आंदोलन होत आहे.
डॉ. अनिल बोंडे यांनी अंबाडा येथे गाईच्या गोठ्यातून गाईचे पूजन करून, आरती ओवाळून शेतकरी व कार्यकर्त्यांसमवेत गोठ्यातूनच मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले. दूधाच्या भाववाढीसाठी भाजप मुख्यमंत्र्यांना पत्र, ई-मेल आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून 5 लाख पत्र पाठवणार आहे. यावेळी ‘मुख्यमंत्री जागे व्हा, शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करा’ अशा घोषणा देण्यात आल्या.