सिंधुदुर्ग – महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काल संध्याकाळी उशिरा माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह वेंगुर्ले रेडी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र रेडी पोर्ट कंपनीचे अधिकारी वगळता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे अब्दुल सत्तार हे कमालीचे भडकल्याचे पाहायला मिळाले.
तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतात काय?, असा सवाल उपस्थित करत महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत.
मी स्वतः सरकारमधील मंञी येतो, तर माझे हे हाल तर तुम्ही काय जबाबदारी पार पाडणार?, पाच दिवसांपूर्वी दौ-याचं नियोजन दिले होते. मग हे कसले तुमचे ढिसाळ नियोजन? याची लेखी तक्रार मुख्यसचिवांना केली जाईल, असं महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तुमच्यासारखा बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतो काय, अशा कडक शब्दांत अब्दुल सत्तार यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिका-यांना दम भरला.