बीड : जर त्या काळात पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि वाढदिवसानिमित्ताने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी 81 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
‘जर त्या काळात पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता, तर आज इथे तुम्हाला तुमचा धनंजय मुंडे दिसला नसता’, असे कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे म्हणाले की, साहेबांचे उपकार फेडायचे म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. मी शरद पवार यांच्यात प्रत्यक्ष देव पाहिलाय. अडचण सोडविणारे देव माणूस पवार साहेब आहेत. साहेबांचा वाढदिवस म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, असेही ते म्हणाले.
परळीच्या जनतेनी 30 हजार मतांनी निवडून दिले असून, जनतेही उपकार केले आहेत. 25 वर्षांपासून मी तुमच्या सेवेत आहेत, पुढेही राहीन, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.