IMPIMP
milind narvekar with eknath shinde milind narvekar with eknath shinde

“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने आता ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणा एका उमेदवाराचा पराभव नक्की मानला जात आहे. अशातच सध्या अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असून शिंदे गटातील आमदार देखील नाराज आहेत. तर मिलिंद नार्वेकरांचे सर्व पक्षाशी चांगले संबंध असून यामध्ये कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत होऊ शकतो असा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारण्याच्या आधी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. यावेळी महाविकास आघाडीतील आमदारांचं क्रोस व्होटिंग झाल्याचं सांगण्यात येत आहे. यातच सध्या कॉंग्रेसकडे ३६ आमदार असून कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव सहज विजयी होऊ शकतात. परंतु शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी नार्वेकरांमुळे प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या २८८ आहे. परंतु काही आमदारांचे निधन झाले तर काही खासदार झाले आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत फक्त २७४ आमदारांची संख्या आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा विजयी कोटा हा २३ मते ठरवण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयी होण्यासाठी आता २३ मतांची आवश्यकता असणार आहे.

यातच सध्या भाजपकडे १०३ आमदार असून त्यांचे पाच आमदार सहज निवडून येतात. शिवसेना शिंदे गटाकडे ३८ मते असून त्यांचे दोन आमदार तर अजित पवारांकडे ३९ मते असून त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसने एक उमेदवार उभा केला असून त्यांच्याकडे ३६ मते असून त्यांचा तो उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त १५ मत असून त्यांना अजून ८ मतांची गरज भासणार आहे. दुसऱ्या बाजूला शेकापचे जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या पाठिंब्यावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु शरद पवार गटाकडे फक्त १४ मत असून त्यांना विजयासाठी आणखी ९ मतांची गरज भासणार आहे.

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असतांनाही क्रोस व्होटिंग झाल्याने कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी देखील क्रोस व्होटिंग होण्याची भीती अधिक व्यक्त करण्यात येत आहे. यातच ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी आता मतांची तजवीज करण्यास सुरूवात केली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी भाजपचे प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांसाठी शरद पवारांना देखील काही मत वळवावी लागणार आहेत. भाजप , कॉंग्रेसकडे अतिरिक्त मत असून ती मत आता कुणाच्या पारड्यात पडणार तेपण पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

Leave a Reply