मुंबई : बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन विविध मदतीसाठी विनंती केली. बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भाने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यांसमोर आपले विषय मांडले.
बीड शहरातुन कोल्हारवाडी ते जिरेवाडीपर्यंत जाणारा महामार्ग रस्ता नुतनीकरण व इतर रस्त्यांच्या कामाचा विषय संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसमोर मांडला. याशिवाय चकलंबा-निमगाव-गारमाथा राज्य रस्ता क्रं- ६२ या रस्त्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन प्रथम टप्यात घेऊन तात्काळ सुरूवात करण्यासाठी देखील विनंती केली.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजाला सणासुदीच्या दिवसात तात्काळ भरीव मदत करण्यात यावी यासाठी देखील शीरसागर यांनी विनंती केली असून, याबाबत शरद पवारांनी देखील सकारात्मक आश्वासन दिले.