कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात गणेश उत्सवा संदर्भात काटेकोर नियमावली ठरवण्यात आली आहे या नियमावलीनुसार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीस मनाई करण्यात आली. त्याचबरोबर बाप्पासाठी मांडव उभारण्यासही मनाई करण्यात आली आहे. याशिवाय देखावे सादर करण्यास आणि गर्दी जमवण्यासह मनाई करण्यात आली.
यंदा गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी शक्यतो कुठल्याच प्रकारचे मांडव उभारु नयेत. गणेश मंडळांनी मंदिरातच श्रींची प्रतिष्ठापना करावी, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलंय. यंदा रस्त्यांवर गणपती मंडळांना श्रींची प्रतिष्ठापना करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिर नसलेल्या मंडळांना मूर्ती ठेवत असलेल्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्याचं आवाहन करण्यात आलंय.
तसेच यंदा गणेशोत्सव साधे पणाने करावा, मिरवणूक करू नहे तसेच आपल्याच गणेश मंडपामध्येच गणेश मूर्तीचं विसर्जन करावे अशा प्रकारचे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील सर्व गणेश मंडळांना केले होते.
मात्र महापौरांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या नियमांवर पुण्यातील मनसेने मात्र आक्षेप घेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना पत्राद्वारे या नियमालीवर आक्षेप घेतला आहे. पुणे मनसेचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौर यांना परत लिहून टीका केली आहे. “पुण्याचे महापौर साहेब आपण इंग्रज होऊ नका , गणेश विसर्जना वर लादलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही विसर्जन घाटावरच करणार….” असे अजय शिंदे यांनी सांगितले आहे.
पुण्याचे महापौर साहेब आपण इंग्रज होऊ नका , गणेश विसर्जना वर लादलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही विसर्जन घाटावरच करणार…. pic.twitter.com/UKZbxktcTO
— Ajay Shinde_MNS (@ajay_mns) August 12, 2020