मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिलं होते. राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. मागील काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी विशेष चर्चेत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या भेटीची आता जोरदार चर्चा सुरू आहे.
मागील काही दिवसात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. त्यामुळे लोकहिताच्या प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते.