IMPIMP
MNS leader Gajanan Kale has said that the meeting took place at Shivtirtha, Dadar MNS leader Gajanan Kale has said that the meeting took place at Shivtirtha, Dadar

“भेट शिवतीर्थ, दादरला झाली अन् चक्क धुर बारामतीवरून निघाला”

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चेंना उधान आलं आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीवर खोचक टिप्पणी केली आहे. त्यावरून आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी त्या टिप्पणी वरून डिवचलं आहे.

आमच्या जीवावर येत असेल, तर…; सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरें आक्रमक 

दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होत असतात. कोणी कुणाच्या घरी गेले याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्याच्या 105 आमदार असलेल्या नेत्याच्या घरी जातो. याचे काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करतात, याचे मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे. ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही तर स्वार्थासाठी सुरू आहे. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

“अन्यथा..! या सरकारची दे माय, धरणी ठाय अशी अवस्था करू” 

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर गजानन काळे यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हमारी अफवाह के धुंए वहींसे उठते है, जहाॅं हमारे नाम से आग लग जाती है, भेट शिवतीर्थ दादरला झाली आणि चक्क धुर बारामतीवरून निघाला. असं म्हणत त्यांनी ताई आगे आगे देखो होता है क्या. असा इशारा देखील  गजानन काळे यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे. त्यामुळे यावर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार ते पहावं लागणार आहे.

“एखादा चित्रपट निघू शकतो”; शिंदेंच्या वक्तव्यानंतर “मी पुन्हा येईन” ची आठवण 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना आणि एकनाथ  शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सेनेतून अनेक जणांची हाकालपट्टी करण्यात आली आहे तर अनेक नगरसेवक, पदाधिकारी, आणि सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.

Read also