मुंबई : सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन करावं, अशा सचूना देण्यात आल्या आहेत. मात्र अशा स्थितीतही काही नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता चक्क महाराष्ट्रातील आक्रमक आणि कडक शिस्तीचे नेते अशी ओळख असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या नियमांचं पालन केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
शुक्रवारी मुंबई ते मांडवा या रो-रो फेरीने राज ठाकरे अलिबाग या ठिकाणी जात होते. त्यावेळी त्यांनी रो-रो बोटीवर मास्क लावला नव्हता. शिवाय ते धूम्रपानही करत होते. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष बाब म्हणजे रो-रो बोटीत प्रवाशांनी धूम्रपान करु नये आणि मास्क परिधान करावा अशा उद्घोषणा देण्यात येत होत्या. तरीही राज ठाकरे यांनी हे नियम पाळले नाहीत. त्यामुळे त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
त्यानुसार राज ठाकरे यांनी त्वरित आपली चूक मान्य करून एक हजाराचा दंड भरला असल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे मांडवा येथे उतरून गाडीतून पुढील प्रवासास निघून गेले. त्यावेळी मात्र जाताना राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावला होता
Read Also :