कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईमध्ये शासनाने लोकल सुरु कराव्यात यासाठी गनिमी काव्याने आंदोलन केले होते. त्यानंतर या प्रकरणी कजर्तहून संदीप देशपांडेसह अन्य तीन कार्यकत्यऱना रेल्वे पोलिसांनी अटक केली होती.
पोलिसांनी आंदोलन करु नका असे सांगून मनसे कार्यकत्र्याना नोटिस बजावल्या होत्या. अखेर या नोटिसचे उल्लंघन करीत मनसेने नेते संदीप देशपांडे यांनी अन्य तीन कार्यकर्त्यांसह कजर्त ते शेलू या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेने प्रवास केला. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
रेल्वे पोलिसांच्या अटकेनंतर आज कल्याणच्या रेल्वे न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने प्रथम न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर देशपांडे यांच्या वकिलांनाने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पंधरा हजाराच्या जामीनावर देशपांडे यांची सुटका केली आहे.
यावेळी न्यायालयाच्या आवारात मनसे कार्यकत्र्यानी एकच गर्दी केली होती. वाहतूक कोंडीचा फटका देशपांडे यांच्या वकिलांना बसला. त्यामुळे त्याना न्यायालयात येण्यास उशिर झाला होता.देशपांडे यांनी या आधी देखील हे आंदोलन सर्वसामान्यांसाठी असल्याचे सांगितले होते.
Read Also
आमच्यासाठी ‘ही’ शंभर हत्तीचे बळ मिळणारी गोष्ट आहे,काँग्रेस नेत्याने मानले शरद पवार यांचे आभारhttps://t.co/hqXvYaP4Cy#SharadPawar #RajivSatav #KisanBill2020 @SATAVRAJEEV @PawarSpeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020