मुंबई : मराठा माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसे नेहमीच रस्त्यावर उतरताना पहायला मिळाले आहे.स्थानिक आमदारांना परप्रांतीयांचा पुळका का येतोय असा सवाल मनसेच्या वतीने विचारण्यात येत आहे.
मनसे वारंवार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आंदोलने करत असते अशातच स्थानिक आमदार सुनील राणे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत मनसेचे नयन कदम यांनी महापालिकेने उचललेले स्टॉल पुन्हा लावले आहेत. तसेच या प्रकरणामध्ये आमदार सुनील राणे हे त्रास देत असल्याचे कदम यांनी म्हंटले आहे.
या आधी देखील मनसेने फेरीवाल्यांसाठी सातत्याने भूमिका मांडलेली आहे. एवढच काय पण मनसेच्या ब्लूप्रिंट मध्ये देखील फेरीवाले यांच्याबाबत अनेकदा स्वतः राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला असल्याचे पहायला मिळाले आहे.त्यामुळेच आता मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिकेने हटवले स्टॊल पुन्हा लावले आहेत. स्थानिक आमदारा विरोधातील संघर्ष हा मनसेसाठी नवा नाही.
Read Also
शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे,CM ठाकरेंनी पुन्हा भाजप सोबत युती करावी 'या' केंद्रीय मंत्र्याने दिली खुली ऑफर https://t.co/7f80OYHscp#Sharadpawar #Devendrafadanvis #Uddhavthackarey #BJP #NDA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020