मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत अनेक मुद्यांवर निर्णयांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी कोरोनापासून ते मेट्रो कारशेड प्रकल्पांबात माहिती दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा अर्थच कळला नसल्याचे म्हणत, मनसेने टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा अर्थ कळवा आणि 1001 रुपये मिळवा अशी खास ऑफरच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
'मा.मुं'च्या कालच्या भाषणाचा अर्थ कळवा,1001रुपये मिळवा..
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 12, 2020
मनसेने मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र लोकल सेवा अद्याप सुरू करणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरात लवकर लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू करणार आहेत. मात्र याबाबत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवून कोरोनाच्या काळात सामान्य प्रवास करू शकतात. याबाबत निर्णय झाल्यावर लोकल सेवा सुरू करणार आहे.
लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय ने घेतल्याने संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्याच्या डॉक्टर आणि कंपाऊंडरने पेशंटची वाट लावली आहे. एकीकडे आदित्य ठाकरे म्हणतात 21 ऑक्टोबरला रेल्वे सुरू करण्याचा प्रयत्न करू तर दुसरीकडे राजेश टोपे म्हणतात नोव्हेंबर अखेरीस सर्व सुरू होईल. म्हणजेच या सरकारमध्ये समन्वय नाही, अशी टीका यावेळी संदीप देशपांडे यांनी केली आहे.