IMPIMP
Modi hai to munkeen hai, Modi ki guaranty created the atmosphere Modi hai to munkeen hai, Modi ki guaranty created the atmosphere

“मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी”, असं वातावरण तयार केलं, पण घडलं काय ?” शरद पवारांचा मोदींना खोचक टोला

मुंबई : प्रधानमंत्री पद ही एक इंस्टीट्युशन आहे. या इस्टीट्युशनची प्रतिष्ठा राखली पाहिजे. ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे. पण त्या पदाची प्रतिष्ठा ही त्या व्यक्तीने सुद्धा कितपत सांभाळयची, याचाही लोक विचार करतात. मागील निवडणुकीत तीनशे पेक्षा जास्त सभापद होते. ते २४० वर आले. याचा अर्थ एवढा मोठा फटका त्यांना लोकांनी दिला. असा टोला देखील शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. बारामती  येथे आयोजित भव्य डॉक्टर्स मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

हेही वाचा..मुरलीधर मोहोळांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार 

पुढे ते म्हणाले की,  मी १९६७ साली निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहिले. तेव्हापासून आजपर्यंत विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, विरोधीपक्ष नेते अशा सगळ्या निवडणुकीत उभा राहिले. या सगळ्या निवडणुकीत तुम्ही लोकांनी मला कधी सुट्टी दिली नाही, सतत मी निवडून आलो.  या देशातील लोकस शहाणे आहेत. आम्ही राज्यकर्त्यांनी काही चुकीचे निर्णय घेतले आणि ते देश हिताचे नसतील तर लोक बोलत नाहीत, पण निर्णय घेतात. माझा स्वभाव आहे की, ज्यावेळी निवडणुकीच्या सभेला जातो तेव्हा समोर बसलेल्या लोकांच्या डोळ्याकडे लक्ष असतं. ते डोळे बरंच काही सांगतात.

हेही वाचा..विधानसभेत महायुतीसमोर धोक्याची घंटा..! अन्यथा, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार ? 

माझ्यासारख्या एक चिंता वाटली की, या निवडणुकीला राम मंदिराचा विषय केलेला आहे आणि त्याची किमंत आपल्याला द्यावी लागेल. पण मंदिर बांधूनही लोकांनी मंदिराच्या बाजूने मतदान केलं नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मंदिर मस्जिद याच्या नावाने धार्मिक राजकारण करायचा प्रयत्न कोणी केला तर लोकांना हे मान्य होत नाही. असेही ते म्हणाले.

यंदाच्या निवडणुकीमध्ये मोदी है तो मुनकीन है, मोदी की गॅरंटी. सगळ्या देशात हे वातावरण होते. मीडियामध्ये वातावरण होते. पण घडलं काय ? निवडणुकीच्या प्रचारामध्ये काही पथ्य, मर्यादा पाळायची असतात. सभ्यता ठेवायची असते. जात-धर्म हे कुठेही त्यात येऊ देता कामा नये. असेही ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्याशी माझे संबंधरी बरे होते. ते बारामतीला आले होते. इथे येऊन त्यांनी सांगितले की, राजकारणात मी शरद पवार यांचे बोट धरून आलो. खोटं होतं. पण सांगितलं. त्यामुळे बारामतीकर खुश झाले. पण ही खुशी खरी नसते. अशा अनेक गोष्ट त्यांच्या सांगता येतील. असाही टोला त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा…“कोकण आणि नाशिकबाबत समझोता झालाय”, विधान परिषदेच्या जागांचा घोळ ठाकरेंनी निकाली काढला 

हेही वाचा..अजित पवार गटाकडून राज्यसभेवर सुनेत्राताई पवार, की पार्थ पवार, की तिसरा कोणीतरी?

हेही वाचा…मंचरमध्ये महाविकास आघाडीत मोठा राडा, कोल्हेंनी निकमांचा ‘भावी आमदार’ उल्लेख केला अन्… 

हेही वाचा…भाजप विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार ? अजित पवार अन् शिंदेंचं काय होणार ? 

हेही वाचा..“जीवंत असेपर्यंत शरद पवारांसोबत राहणार”, बीडच्या बजरंग सोनवणेंनी मिटकरींना दिलं प्रत्युत्तर