नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. अनेक राज्यांमध्ये स्थिती गंभीर असून, परिस्थितीप्रमाणे त्या-त्या राज्यांमध्ये नवीन करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. दुसरीकडे करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राजुत १ मार्च पासून सुरु झाला असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेद्वारे लस टोचवून घेण्याचे आवाहन देशभरातील नेत्यांकडून केले जात आहे.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवार) नवी दिल्लीतील एम्सच्या रुग्णालयात जाऊन लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांना यापूर्वी १ मार्च रोजी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता. एम्स रुग्णालयातील परिचारीका निशा शर्मा यांनी यावेळी त्यांना लस दिली. त्यांच्यासोबत परिचारीका पी.निवेदा यादेखील उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर नागरिकांनाही लसीकरण पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. “एम्स रुग्णालयात आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोनाला हरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक पर्याय आहे. जर तुम्ही कोरोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच लसीकरण पूर्ण करा. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा,” असं मोदी म्हणाले.
यावेळी परिचारिका निशा शर्मा यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला असता त्यांनी, “आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीचा दुसरा डोस दिला. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यांना भेटण्याची संधी मिळाली हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण राहिल,” अशी प्रतिक्रिया दिली.
सध्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन व्हर्कर्स, डॉक्टर्स यांना लस देण्यात आली होती. त्यानंतर ६० वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात आली. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून यात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे.
The two nurses who administered #COVID19 vaccine to PM Narendra Modi at AIIMS, Delhi are — P. Niveda from Puducherry and Nisha Sharma from Punjab.
— ANI (@ANI) April 8, 2021