नवी दिल्ली : महाराष्ट्राची लेक म्हणून आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हटलं आहे. तसेच मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला आहे.
नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवलं
“दीड तासांचं पंतप्रधानांचं भाषण झालं. खूप अपेक्षेनं मी त्या भाषणाकडे पाहत होते. कारण खूप अडचणीच्या काळातून आपला देश चालला आहे. महामारीतून संपूर्ण जग हळूहळू बाहेर पडतंय. त्यामुळे माननिय पंतप्रधानांनी आपल्या सर्वांना एक दिशा द्यावी, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैव की, आपल्या महाराष्ट्राबाबत पंतप्रधान जे बोलले ते दुर्दैवी. मला स्वतःला वैयक्तिकपणे दुःख देणारी गोष्ट.
किशोरी पेडणेकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिली लिफ्ट; गोवा ते मुंबई प्रवासाची राज्यभर चर्चा
ज्या राज्यानं फुल न फुलाची पाकळी म्हणा. पण 18 खासदार भाजपला महाराष्ट्रानं निवडून दिले आहेत. म्हणजे, मोदींना पंतप्रधान होण्यासाठी महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कोविड सुपर स्प्रेडर म्हणून त्यांनी केला. हे अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ते भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.”, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या.
अजरामर गाण्यांमुळे लतादिदी सदैव आपल्यासोबत असतील – चंद्रकांत पाटील
सुप्रीया सुळे बोलताना म्हणाल्या की, “एका पक्षाच्यावतीनं पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झालं. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचं नाही. मोदी भाजपचे पंतप्रधान नसून देशाचे पंतप्रधान आहेत.”
Read also:
- ठाण्यातील बॅनरबाजीमुळे सेनेच्या गोटात खळबळ; एकनाथ शिंदेनी दिला तात्काळ ‘हा’ आदेश
- बाबूश यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच जोशुआचं मार्गक्रमण – सदाभाऊ खोत
- पुन्हा भिर्रर्र… आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळरावांनी केले बैलगाडा शर्यतीचे आयोजन
- नितेश राणेंना काही झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची – प्रवीण दरेकर
- एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री; ठाण्यातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा