मुंबई : शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. दोन्ही पक्षाचे वैर इतके वाढले आहे की, कधीकधी नेते एकमेकांचे तोंडसुद्धा पाहत नाहीत. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रसंगाची चर्चा रंगली आहे. इतर वेळी एकमेकांवर टीका करणारे राजकारणी गरज पडल्यावर एकमेकांच्या मदतीला येतात, याचाच प्रत्यय गोव्यात आला.
नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी
शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गोव्यात प्रचारासाठी आल्या होत्या. पण, अचनाक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांना मुंबईला जावे लागले. पण, पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या चार्टर प्लेनंने मुंबईकडे येत असल्याचे त्यांना समजले.
लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण नको; राम कदमांच्या स्मारकाच्या मागणीवरून संजय राऊतांनी फटकारले
यानंतर पेडणेकरांनी फडणवीसांसी संपर्क साधला आणि गोव्यातून मुंबईला जाण्यासाठी लिफ्ट देण्याची विनंती केली. देवेंद्र फडणवीसांनीहीकिशोरी पेडणेकरांची विनंती मान्य केली आणि त्यांना मुंबईपर्यंत लिफ्ट दिली. देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन यांच्यासोबत मुंबईला आले. त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईपर्यंत आल्या. गरजेच्या वेळी राजकारणी एकमेकांना मदत करतात, हे या प्रसंगावरुन दिसून आले.
Read also:
- मोठी बातमी: नितेश राणेंच्या छातीतील दुखणे वाढले, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवलं
- शाहरुख खानला ट्रोल करणं हा नालायक आणि बेशरमपणा आहे – संजय राऊत
- गोवा विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हापसा मतदार संघात होणार सभा
- प्रचारादरम्यान मतदारांनी फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना दिला उजाळा; जोशुआ झाले भावूक
- उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार; किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा