मुंबई : शाहरुख खान दुवा मागत होता. त्याला ट्रोल केलं जातंय. हा काय प्रकार आहे. हा निव्वळ नालायक आणि बेशरमपणा आहे. एका गटाकडून, परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांनी टीका करताना कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांनी एका परिवाराकडून शाहरुखला ट्रोल केलं जात आहे, असं सांगून संशयाची सुई भाजपच्या दिशेने वळवली आहे. त्यामुळे राऊत यांच्या या टीकेवरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच भाजप त्यावर काय प्रतिक्रिया देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उदयनराजेंच्या दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे सातारा एमआयडीसीची वाढ होईना; शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने दुवा पढली. त्यावरून वाद रंगला आहे. यावेळी शाहरुख खान थुंकल्याचं सांगत काही ट्रोलर्सनी शाहरुखवर हल्ला चढवला आहे. शाहरुखला ट्रोल केलं जात असल्याने शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निशाणा साधला.
स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच गोव्याच्या विकासाचे शिल्पकार – देवेंद्र फडणवीस
लता मंगेशकर यांच्या पार्थिवार काल संध्याकाळी शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी लतादीदींना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होते. या दोघांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शाहरुख खानने इस्लामिक परंपरेनुसार दुवा मागण्यासाठी दोन्ही हात वर केले. त्यानंतर लतादीदींच्या पायांना स्पर्श अभिवादन केलं. त्यानंतर दुवा पठण केल्यानंतर मास्क काढून परंपरेनुसार फुंकर मारली. मात्र, शाहरुख खान थुंकल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले. शाहरुखला ट्रोल केलं गेलं. त्यामुळे संजय राऊत आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच झापलं असून इस्लामिक परंपरा समजावून सांगितलं आहे.
Read also:
- गोवा विधानसभा निवडणूक: पंतप्रधान नरेंद्र मोदींची म्हापसा मतदार संघात होणार सभा
- प्रचारादरम्यान मतदारांनी फ्रान्सिस डिसोझा यांच्या आठवणींना दिला उजाळा; जोशुआ झाले भावूक
- उद्धव ठाकरे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करणार; किरीट सोमय्यांचा गंभीर इशारा
- लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण नको; राम कदमांच्या स्मारकाच्या मागणीवरून संजय राऊतांनी फटकारले.
- नितेश राणेंचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी