सातारा : साताऱ्यात आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला आहे. दोन्ही राजे जरी भारतीय जनता पक्षात असले तरी त्यांच्यातील संघर्ष थांबता थांबेना झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पून्हा एकदा त्यांच्यात आरोप,प्रत्यारोप सुरु झालेले दिसत आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्हच्या जागेची चौकशी लावणार असल्याचा इशारा खासदार उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याला आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी खरमरीत उत्तर दिले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता १ ते ८ वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; अजित पवारांची घोषणा
साताऱ्यातील एमआयडीसी म्हणजेच औद्योगिक क्षेत्राचा विकास न होण्यामागे मुख्य कारण म्हणजे उदयनराजे आहेत. उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्या करायच्या आदी कामे उदयनराजे आणि त्यांचे बगलबच्चे करत असतात. उदयनराजेंची असलेली ही प्रव्रुत्ती आणि इतरही काही कारणांमुळे एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्याचा आरोप शिवेंद्रसिंहराजे यांनी एका कार्यक्रमांतर्गत केला आहे.
नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
येणाऱ्या प्रत्येकाला दमदाटी करायची, संघटना काढायची, आमचीच माणसे घ्या म्हणून दबाव आणत बघतो, अशी धमकी देणाऱ्यांनी सगळ्या साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्राची वाट लावली आहे. या कारणांमुळे साताऱ्यात कारखानदार येत नसून आम्ही ‘पंडित’ची जागा रितसर खरेदी केली आहे.त्या ठिकाणी आम्ही कारखानाच काढणार आहोत. त्यातून रोजगारदेखील निर्माण होणार आहे. बंद पडलेल्या अनेक चांगल्या गोष्टी आम्ही सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यात काहीजण जाणून बुजून खोडा घालत असल्यामुळे सध्या आम्हाला यश येत नाही. उदयनराजे याला कारणीभूत आहेत असा आरोपही शिवेंद्रराजे यांनी केला आहे.
Read also:
- म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर
- महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे
- महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये – नाईक
- स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- एक झंझावती युगं संपलं; गानकोकिळा लता मंगेशकर यांच निधन, देशावर शोककळा