म्हापसा : म्हपश्यातील विधानसभेची निवडणूक अतिशय रंगतदार बनली आहे. २ दशके ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत होता त्या मतदारसंघात आता बहुरंगी लढत होत असल्याने सर्वांचेच लक्ष या मतदारसंघातील लढतीकडे लागले असताना भाजप सरचिटणीस योगेश खेडेकर यांनी जोशुआ डिसुझा यांनाच जनतेने निवडून का दिले पाहिजे बाबत आपलं मत व्यक्त केले आहे.
उदयनराजे भोसले अजित पवारांच्या भेटीला; पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? राजे म्हणतात…
ते म्हणाले, आ. जोशुआच्या नेतृत्वात म्हापसा मंडळ हे जास्त सक्रिय झाले. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवणे हा त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनामुळे म्हापसा मंडळ आणि सर्व कार्यकर्ते हे या निवडणुकीत एकदिलाने लढत आहेत. म्हापसा भागातील नागरिकांना ते सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असतात. खेळाडूना क्रीडा विषयक साहित्य ते सतत पुरवत आलेले आहेत. सर्व स्थरातील लोकांना ते वेळोवेळी सहकार्य करत आलेले आहेत.
लतादीदींची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास; राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
ते म्हणाले, जोशुआ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वैद्यकीय मेळावे,शिबिरे घेतले आहेत. यातून रुग्णांना बरीच मदत झाली आहे. स्व. बाबुश यांच्या जयंती निमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करतो. त्यात १०० हून अधिक तरुण रक्तदान करतात. नेत्रचिकित्सा शिबिरे तसेच अनेक लोकोपयोगी शिबिरांचे आयोजन आम्ही करत आलो आहोत. त्यामुळे निवडणुका घोषित होताच आम्ही एकदिलाने ठरवले की त्यांनाच यंदा भरघोस मतांनी निवडून आणायचे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता १ ते ८ वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू होणार; अजित पवारांची घोषणा
आमचा उमेदवार तरुण असून इतर उमेदवार हे वयोवृद्ध आणि कालबाह्य झालेले आहेत. नव्या पिढीला तरुण उमेदवार भावत आहे कारण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन योजना त्यांच्याकडून राबविल्या जातील असा विश्वास युवकांना वाटत आहे. आमचे आमदार भूमिगत विद्युतीकरण कार्य हाती घेतले आहे. म्हापश्यात जुना पूल कालबाह्य ठरला असून आता तिथे मोठा रस्ता होणार आहे. म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता त्यांना निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
Read also:
- महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे
- महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये – नाईक
- स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- एक झंझावती युगं संपलं; गानकोकिळा लता मंगेशकर यांच निधन, देशावर शोककळा
- नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार