सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर कोकणात राजकारण चांगलेच तापले होते. शिवसैनिक संतोष परब यांना निवडणुकीच्या काळात आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती असा आरोप संतोष परब आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता.
नितेश राणेंचा रक्तदाब वाढला, छातीचं दुखणं कायम; आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार
त्यानंतर नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण निवडणूक होऊपर्यंत आमदार नितेश राणे हे अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती.
एक झंझावती युगं संपलं; गानकोकिळा लता मंगेशकर यांच निधन, देशावर शोककळा
आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात येणार होती मात्र आज राष्ट्रीय दुखवटा असल्याने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नाही. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. दोन दिवसाची पोलीस कोठडी आणि त्यानंतरच्या घडामोडी नंतर आमदार नितेश राणेंची तब्येत बिघडली होती. गेले दोन दिवस आमदार नितेश राणे जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे आणि चार दिवसांपासून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे .
स्वर युगाचा अंत झाला, मातृतुल्य आशीर्वाद हरपला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलीस कोठडीतून सुटका झाल्यामुळे नितेश राणे जामीन अर्जासाठी धावाधाव करत आहे. मात्र रविवारची सुट्टी आल्यामुळे सुनावणी सोमवारी ढकलण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या निकालाबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
Read also:
- स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच गोव्याच्या विकासाचे शिल्पकार – देवेंद्र फडणवीस
- उदयनराजेंच्या दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे सातारा एमआयडीसीची वाढ होईना; शिवेंद्रराजेंचा गंभीर आरोप
- म्हापश्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनताच आता जोशुआ डिसुझा यांना निवडून देईल – खेडेकर
- महाविकास आघाडीच्या छळामुळेच गजानन चिंचवडे यांचा बळी : माजी खासदार अमर साबळे
- महिला वर्गाने बाहेरून पर्यटक बनून आलेल्या पक्षाला थारा देवू नये – नाईक