IMPIMP
Modi took five and a half thousand crores from cow slaughtering companies to contest elections Modi took five and a half thousand crores from cow slaughtering companies to contest elections

“निवडणूक लढविण्यासाठी मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी घेतले”

नाशिक :  राज्यातील चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा काल सांयकाळी थंडावल्या आहेत. यातच आता राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदारसंघाकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच काल नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी काल संजय राऊतांनी नाशकात सभा घेतली. यावेळी राऊतांनी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात चढवला.

हेही वाचा…“त्यावेळी घरदार अन् राजकारण सोडून कुठेतरी गेलो असतो”, मोहोळांनी सांगितली जूनी आठवण 

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निष्कलंक आहेत. निष्ठेची चादर राजाभाऊ वाजे यांच्यावर आहे. सभेच्या वेळी सातपुर येथील कामगार नागरिकांकडून राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीसाठी पन्नास हजारांची मदत करण्यात आलीय. मात्र यावर संजय राऊत यांनी बोलत असताना राजाभाऊ या पन्नास हजारांवरून तुम्हाला ईडीची नोटीस येऊ शकते. असे म्हणत थेट मोदींवर टीका केली. पण हे २० हजार पवित्र आहेत. त्यामुळे तुम्हाला जनतेने आशीर्वाद दिलाय. असेही ते म्हणाले.

हेही वाचा..“आढळराव पाटलांना विजयाचा चौकार मारण्याची संधी द्या”, शेवटच्या क्षणी अजितदादांचं मतदारांना आवाहन 

दरम्यान, मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी निवडणूक लढविण्यासाठी घेतले. असा आरोप करत राज्यभर सुड घेण्याचं काम तो करतोय. राज्यातील सर्व उद्योग गुजरातला पळवले. मराठी माणसाला कंगाल करण्याचं काम मोदींनी केले. लढणाऱ्या महाराष्ट्राला पांगळं केलं.

मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी निवडणूक लढवण्यासाठी घेतले. राज्यभर सूड घेण्याचं काम तो करतोय. राज्यातील सर्व उद्योग गुजरातला पळवले. मराठी माणसाला कंगाल करण्याचं काम मोदींनी केलं. लढणाऱ्या महाराष्ट्राला पांगळं केलं.” तुझ्या बापाची लोकशाही आहे का? नरेंद्र मोदी फेकाफेकीत गोल्ड मेडल मिळवेल. मोदी आणि शहा यांनी हा देश नामर्दांचा केला आहे. ४ जूननंतर अनेक लोक देशाबाहेर पळून जातील. त्यामुळे त्यांचे पासपोर्ट जप्त करा. भस्म लावणे हे काय पंतप्रधानाचे काम आहे का? असा सवालही त्यांनी केला. तर  १०० नरेंद्र मोदी येऊ द्या राज्यातील दहा तरी जागा जिंकून दाखवा. महाराष्ट्राने ठरवलं तर गुजरातमध्ये राहणं देखील मुश्किल होईल. असा इशाराही त्यांनी दिलाय.

READ ALSO :

हेही वाचा…“प्रचाराच्या तोफा थंडावल्या, अंतिम टप्प्यात महायुतीची मुसंडी” 

हेही वाचा..“ती धमक आमच्यात, नट हे काम करू शकत नाही”, अजित पवारांचा कोल्हेंना टोला 

हेही वाचा…राज ठाकरेंचा फतव्यानंतर पुण्यात “आमचं ठरलंय”चा ट्रेंड! मोहोळांच्या पथ्यावर पडणार 

हेही वाचा…“तुमची स्वप्न पुर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आढळरावांना विजयी करा”, नितीन गडकरी 

हेही वाचा…“गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी पुण्याचं चित्र बदललं”, पुण्यात मोहोळांसाठी फडणवीसांची सांगता सभा