IMPIMP

एक्झिट पोलमध्ये पुण्यात मोहोळ सरस, धंगेकरांना बसणार मोठा फटका ?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी भाजपला सर्वात जास्त जागा मिळून त्यांची सत्ता स्थापन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राज्यात महायुतीला मोठा फटका बसणार असून मागच्या निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यातच सर्वात जास्त चर्चेत आलेल्या पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ लढत झाली. मात्र वंचित कडून वंसत मोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत चांगलीच अटीतटीची झाली. यातच आता टिव्ही ९ पोलस्ट्रेटच्या पोल नुसार याठिकाणी मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतली होती तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मोहोळांसाठी जाहीर सभा, रँली आणि महत्त्वाच्या बैठका घेतल्या. दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर यांच्या साठी राहूल गांधींची सभा झाली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही धंगेकरांसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे येत्या ०४ जुन ला काय निकाल लागणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.