IMPIMP

पुण्यात मोहोळांनी घेतली मोठी आघाडी, कॉंग्रेसचे धंगेकर पिछाडीवर

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं कल यायला सुरुवात झाली आहे. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडीमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळत आहे. एनडीए आघाडी सह इंडिया आघाडीने मँजिक फिगर गाठली आहे. यातच पुणे लोकसभा मतदारसंघात सुरूवातीपासून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात सध्या महायुतीचे १८ तर महाविकास आघाडीचे २९ उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर एक अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

यातच पुणे लोकसभा मतदारसंघात मोहोळांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर सध्या पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

रवींद्र धंगेकर आघाडीवर असलेले मतदारसंघ

◾कसबा-५००

◾शिवाजीनगर- १०००

◾पर्वती-४००

◾कॅन्टोनेंट- ११००

तर मुरलीधर मोहोळ हे

◾वडगाव शेरी-३५००

◾कोथरूड- ६००० मतदारसंघातून आघाडीवर.

सद्यस्थितीत मुरलीधर मोहोळ हे पहिल्या फेरीत ६००० मतांनी आघाडीवर