मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेनेला मोठा धक्का देत अभिनेते आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. निवडणुकीत अमोल कोल्हेंनी शिवसेना नेते आढळराव पाटील यांचा पराभव देखील केला होता. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आज वर्षभरानंत पहिल्यांदाच त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांना माझे 'शिवगंध' हे पुस्तक भेट दिले.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 3, 2020
आदित्य ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीची माहिती कोल्हे यांनी ट्विटरवर शेअर केली. शिरुर मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांबाबत त्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मतदारसंघातील ‘भक्ती-शक्ती कॉरीडॉर, ‘शिवसंस्कार सृष्टी’ व मतदारसंघातील पर्यटनाच्या संधी याविषयी चर्चा केली.
ही चर्चा अतिशय सकारात्मक झाल्याचे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच, कोल्हे यांनी यावेळी स्वतः लिहिलेले शिवगंध हे पुस्तक देखील आदित्य ठाकरेंना भेट दिले.