राज्यात दिवसोंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. अनेक नेते मंडळींनाही कोरोनाची लागण झाली आहे. नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे
कोरोनामुक्त झाल्यानंतर देगलूर येथे दौरा असताना नायगाव शहरातील त्यांच्या समर्थकांकडून विविध ठिकाणी सहृदयी सत्कार करण्यात आला. दरम्यान राज्यात आणि देशात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून राज्यातील आकडेवारी ८ लाखांचा पार गेली आहे. त्यामुळे प्रश्नाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.