मुंबई : कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्याची दखल घेत त्यांची ‘फेम इंडिया 2020’ मध्ये निवड करण्यात आली आहे. यात देशभरातील ५० प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या कार्याची नोंद यामध्ये घेण्यात येते.
प्टेंबर महिन्यात त्यांना ‘आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी राबवलेल्या मोहिमांचे विशेष कौतुक झाले. त्यांनी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम यशस्वीपणे राबवली. . या मोहिमेत त्यांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि क्वारंटाईन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्यक्ष काम केले.
धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात मोठ्या प्रमाणात टेस्टिंग तसेच ट्रेसिंग केल्याने त्यांच्या या कार्याचीही दखल घेण्यात आली होती. त्यांच्या या कार्यासाठी इंडो – अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आयएसीसी कोविड क्रुसेडर 2020 – एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस् – इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांना पुरस्कार देण्यात आला.