मुंबई : मुंबई पोलिसांविरोधात एक मोहीम चालवली गेली. मात्र सत्य अखेर समोर आलं. सोशल मीडियावर फेक अकाउंट बनवून एक मोहीम चालवली गेली त्याबाबत चौकशी सुरू असून कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. काही मीडियानंही मुंबई पोलिसांवर विरोधात एक मोहीम चालवली. १६ जून सुशांतचा कुटुंबियांची विधानामध्ये देखील त्यांनी ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पण कुटुंबातील सदस्य चौकशीसाठी आले नाहीत अस मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय.
मुंबई पोलिसांविरोधात ठरवून मोहिम चालवली गेल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. आमची चौकशी ही प्रोफेशनल होती. AIIMS नेदेखील आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला दिला. यामध्ये आम्हाला कोणतही आश्चर्य वाटलं नसल्याचे ते म्हणाले.
अभिनेता सुशांत सिह राजपूतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष मुंबई पोलिसांच्या तपासात निघाला. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करण्यात आला. सरकारच्या दबावाखाली मुंबई पोलीस काम करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा आणि सीबीआयकडे द्यावा ही मागणी मान्य करण्यात आली. पण एम्सच्या अहवालानंतर त्याच्या शरीरात विषाचा अंश किंवा घातपात झाल्याचा निष्कर्ष निघाला नाही.
सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.
Read Also ;
कंगनाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पूर्ण, तर संजय राऊतांचा कंगनाला पुन्हा टोला https://t.co/IkanWAnufl
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020