IMPIMP
Nana Patole with Vinod Gurav Nana Patole with Vinod Gurav

“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार

अकोला : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्यांनी पाय धुतले. याप्रकरणानंतर राज्यातील महायुतीतील नेत्यांनी नाना पटोले तसेच कॉंग्रेसवर जोरदार प्रहार केला होता. यातच आता ज्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पाय धुतले होते. ते विनोद गुरव माध्यमांसमोर पुढे आले आहेत. तसेच नानाभाऊ माझे दैवत आहेत. त्यांचे एक काय दहा वेळा पाय धुवेन असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

हेही वाचा..“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला 

संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नाना पटोले अकोले येथे पोहचले होते. त्यादिवशी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने चिखल झाला होता. यातच गाडीपर्यंत जाताच नाना पटोले यांचे पाय चिखल्याने माखले. त्यानंतर विनोद गुरव यांनी स्वत : पाणी आणून नाना पटोले यांचे पाय धुतले. त्यानंतर अमोल मिटकरी, राम कदम, संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर टिका केली. त्यावर नाना भाऊ माझे दैवत आहेत. मी एकदा नाही तर दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन, असं प्रत्युत्तर विनोद गुरव यांनी दिलंय.

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझ्या कुटुंबाबाबत किंवा नानांबाबत कुठलंही राजकारण करू नका. याच कार्यक्रमात नानांनी एका वृद्ध महिलेला हाताला धरून स्टेजवर नेलं आणि साडीचोळीने तिचा सत्कार केला. हे मीडियाने का दाखवलं नाही? असा सवालही त्यांनी केला.

READ ALSO :

हेही वाचा..“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

हेही वाचा..मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ? 

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

Leave a Reply