महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेडमधील मनसेचे शहराध्यक्ष सुनील ईरावार या 27 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहून ठेवली होती.
या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली. राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही, असे सुनील यांनी नोटमध्ये लिहिले आहे.
सुनीलचे अखेरचे पत्र :
अखेरचा जय महाराष्ट्र’
यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.
राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.
जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे
आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.
आई मला माफ करं,
तुझाच सुनिल