बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटवल्याने महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटून आले व शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया देत भाजपला टोला लगावला होता. “वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का?” असा सवाल राऊतांनी विचारला होता.
संजय राऊत यांच्या या प्रश्नावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा?” अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा? असा सवाल राणेंनी विचारला. तसेच सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे.