सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आथा सीबीआय करत आहे. सीबीआयने सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी आणि कूक नीरजची चौकशी केली आहे. आता सीबीआय रिया चक्रवर्तीला देखील चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून राज्यात देखील अनेक आरोप होत आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी या प्रकरणात सरकारमधील एक मंत्री असल्याचा उघड आरोप केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे सुशांतच्या मृत्यू प्रकरणाविषयी म्हणाले की, मी आधीच बोललो आहे की सुशांतसिंह प्रकरणात सरकारमधील एक मंत्री आहे. याबाबत निलेश राणेही बोलले आहेत.
सीबीआयने मला बोलवावे. मी सर्व माहिती देण्यास तयार आहे, असेही नारायण राणे म्हणाले. याआधी देखील नारायण राणे यांनी सुशांतची आत्महत्या नसून, हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता.