सिंधुदुर्ग – अब्दुल सत्तार गेल्या आठवड्यात दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कोकणातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सत्तार यांच्या याच दौऱ्यावर नारायण राणे यांनी टीका केली.
“महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार कोण आहेत? त्यांना कोकणाबाबत काय माहिती आहे? महसूल राज्यमंत्र्याला काय अधिकार आहेत?”, असे सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.
“राज्याचा महसूलमंत्री काँग्रेसचा आणि राज्यमंत्री शिवसेनेचा, कोण विचारतंय? काहीही बोलतो. सत्तारांना मी गेल्या चाळीस वर्षांपासून ओळखतोय. ते अगोदर अशोक चव्हाण यांच्याबरोबर फिरायचे”, असा टोला भाजप नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.
“कोकणातील 11 आमदार विधानसभेत कोकणातील विकासा संदर्भात बोलतात का? जाहीर केलेला फंडही सरकार देत नाहीत. त्यामुळे आमदार काहीही करू शकत नाही. पालकमंत्री तर निष्क्रीय आहे. काही कामाचे नाहीत. ते जिल्ह्यात येऊन काय करतात हे एक दिवस सांगेन. शिवसेनेचे आमदार विधानसभेत नाही बोलले तरी कोकणाचा विकास थांबवायचा नाही हे आम्ही ठरवलं आहे. कोकणातील विकासाला चालना मिळालीच पाहिजे. त्यासाठी भाजप आंदोलन करेल”, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
Read also
आता महाराष्ट्रानंतर पवारांचे गोव्याकडे लक्ष; राष्ट्रवादीची गोव्यात मोठी खेळी? https://t.co/GQtzOnHm4A @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @BJP4India @BJP4Maharashtra @BJPLive
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 3, 2020