नाशिक – नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी भाजपा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बेट घेतील, असं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले
राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.”
वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नवा असून यांपैकी गीते हे नाशिकमधील शिवसेनेचे पहिले महापौर होते. तर बागूल हे जिल्हा प्रमुख होते. मात्र, सध्या भाजपामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रांकडून कळते. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.
दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडत राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर गीते त्यांच्यासोबत गेले. पुढे ते मनसेकडून आमदारही झाले. त्यानंतर ते सत्ताधारी भाजपामध्ये सामिल झाले. तर बागूल शिवसेनेतून बाहेर पडत राष्ट्रवादीत आणि नंतर भाजपात गेले. सुनील बागूल यांच्या आई नाशिक महापालिकेत सध्या भाजपाच्या उपमहापौर आहेत