नाशिक : नाशिकच्या पर्यटन केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. गंगापूर धरणावरील या पर्यटन केंद्रात बोट क्लब निर्माण करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच हा बोट क्लबचा प्रकल्प सुरु केला जाईल. हा राज्यातला एक नंबरचा बोट क्लब असणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले
या माध्यमातून नाशिकच्या अर्थकारणात मोठी गती मिळणार आहे. या मेगा पर्यटन संकुलात समाविष्ट असलेल्या बोट क्लबच्या डिझाईनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. तसेच परदेशातून नामवंत मासिकांनी याची दखल घेऊन आपल्या फ्रंट पेजवर त्याची दखल घेतली असल्याची माहिती भुजबळ यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी बोलताना भुजबळ म्हणाले, येथील क्लबसाठी कॅनडाहून 50 बोटी आणल्या होत्या. मागच्या सरकारच्या काळात त्यातील काही इतरत्र देण्यात आल्या. उर्वरीत बोटी लोकांनी सुरक्षित ठेवल्या होत्या. त्यांची तपासणी करून त्या उपयोगात आणल्या जातील. नव्याने काही बोटींची आवश्यकता असेल, तर त्या आणल्या जातील. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल राज्य शासनाच्या वतीने येथे साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटरसह कलाग्राम सुरु करु.
पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही कामे तातडीने हाती घेण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात खेचून आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे देखील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
Read Also
मंत्रीपदाचा मला दिलेला शब्द नेत्यांनी पाळला नाही,आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केली खदखदhttps://t.co/aHgFuwdXWW#DilipMohite #NCPMLA #NCP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020