नशिक – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठका सुरु झाल्या आहेत. शहरात आज ( 26 डिसेंबर) महाविकास आघाडीतील अटकपक्ष असेलेल्या काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या.
या बैठकामध्ये दोन्ही पक्षांद्वारे 2022 साली होणाऱ्या पालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकामध्ये शिवसेनेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याची माहिती आहे. तर काँग्रेसनेही निवडणुकीच्या अनुषंगाने डावपेच आखायला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
औरंगाबाद, मुंबई तसेच नाशिक शहरातील महापालिका निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. या तिन्ही शहरांतील महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात.
आपल्या पक्षाचा जनाधार, उमेदवाराच्या जिंकण्याची संभाव्यता या सर्व गोष्टींच धांडोळा पक्षांकडून घेण्यात योतो. या पार्श्वभूमीवर नाशिमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शहरात आज दोन पक्षांच्या पादाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. दोन्ही पक्षांकडून आपापली ताकद तसेच, मागील निवडणुकीतील अपयशाची मिमांसा या बैठकीत केली गेली.