IMPIMP
Nathabhau got angry with only Sharad Pawar for the right to demand my resignation Nathabhau got angry with only Sharad Pawar for the right to demand my resignation

“माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त शरद पवारांकडे”, नाथाभाऊ का चिडले ?

जळगाव : माझा भाजपा प्रवेश निश्चत असल्याचं मला विनोद तावडे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका होईपर्यंत मी थांबलो आहे. कारण काही जणांनी माझ्या पक्षप्रवेशाला नाराजी व्यक्त केली. आता या निवडणुका संपल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वरिष्ठांकडून केला जाईल. त्यानंतर माझ्या पक्षप्रवेशाचा मार्ग सुकर होईल असा आशावाद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा…राज ठाकरेंचा फतव्यानंतर पुण्यात “आमचं ठरलंय”चा ट्रेंड! मोहोळांच्या पथ्यावर पडणार 

भाजपमध्ये येण्याचा मी स्वत: निर्णय घेतला आहे. पक्ष प्रवेश करण्याच्या संदर्भात भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांनी देखील अनुकुलता दर्शवली आहे. त्यामुळे हा पक्ष प्रवेश आज आणि उद्या निश्चित होणार आहे. सध्या विधान परिषद सदस्य या नात्याने आमदार आहे. यातच शरद पवारांनीच सांगितलं आहे की नाथाभाऊंचा राजीनामा घेणार नाही. याचा अर्थ मी पुढील चार वर्ष आमदार म्हणूनच राहणार आहे. शरद पवारांनी सांगितल्याने दुसऱ्यांनी राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही.  त्यामुळे माझा राजीनामा मागण्याचा अधिकार फक्त शरद पवारांकडे आहे. असेही खडसे म्हणाले.

हेही वाचा…“तुमची स्वप्न पुर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आढळरावांना विजयी करा”, नितीन गडकरी 

यापुढे निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मतदारांचा कौल पाहता तसेच रक्षाताईचं काम पाहता आणि मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे, यासाठी मतदारांचा आशीर्वाद त्यांना नक्कीच मिळेल. अन् रक्षाताई तिसऱ्यांदा खासदार म्हणून याठिकाणांहून निवडून जातील. असा विश्वास देखील एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला का निवडून आणलं नाही ?”आव्हाडांचा अजित पवारांना सवाल 

हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांनी ठोकलं शतक, राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते 

हेही वाचा..“निवडणूक लढविण्यासाठी मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी घेतले” 

हेही वाचा…“प्रचाराच्या तोफा थंडावल्या, अंतिम टप्प्यात महायुतीची मुसंडी” 

हेही वाचा..“ती धमक आमच्यात, नट हे काम करू शकत नाही”, अजित पवारांचा कोल्हेंना टोला