नवीदिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. या प्रकरणानंतर त्या शिवसैनिकांना अटक देखील झाली होती. त्यानंतर मात्र राज्यातील विरोधक असलेल्या भाजपला हातात आयत कोलीत मिळाल्याने भाजपने शिवसेनेवर सडकून टीका करायला सुरुवात केली होती. आता या प्रकरणामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे.
मुंबई येथे गुंड प्रवृत्तीच्या शिवसैनिकांनी माजी सैनिक मदन शर्मा यांचेवर जो भ्याड प्राणघातक हल्ला केला त्याची सखोल चौकशी करा व हल्लेखोरांना कठोर शिक्षा द्या अशा मागणीचे पत्र राणा यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले आहे. राणा यांनी दिल्लीमध्ये स्वतः संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन अशी मागणी केली.
माजी अधिकारी मदन शर्मा यांनी ‘कायदा-सुव्यवस्थान संभाळणे जमत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी केली होती. आता यावर सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आलेली होती.
Read Also
मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ म्हणून साजरा करावाhttps://t.co/q0DnutNiYy@PMLUCKNOW #marathinews #pmmodi
.— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 15, 2020