पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने महाविकासआघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे
“भारतनाना माफ करा, पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली. यात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला. यानंतर मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती. पैसा आणि सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. pic.twitter.com/TcMxkbSmQL
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 2, 2021