IMPIMP
Vishal Wakadkar (1) Vishal Wakadkar (1)

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला गळती सुरूच, अजित पवारांनी आणखी एक धक्का

पिंपरी चिंचवड :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पिंपरी चिंचवड शहरात गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षात प्रवेश करणार असतानाच, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  या दोघांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शहरातील अजित पवार गटात सध्या अस्वस्थता पसरली आहे.

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी माजी नगरसेवकांसह शरद पवार यांची भेट घेतल्याने संघटनेतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गव्हाणे हे मेळावा घेऊन काही नगरसेवकांसह लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यातच आता युवकच्या पदाधिकाऱ्यांनीही आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी काळभोर आणि वाकडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

वाकडकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे शहराध्यक्षही होते. काळभोर हे युवकच्या प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत होते. सध्या ते ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष होते. या दोघांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरूवात झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

READ ALSO :

हेही वाचा…पर्वतीमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच, श्रीनाथ भिमाले की माधुरी मिसाळ ? एकच चर्चा

हेही वाचा…जरांगे पाटलांच्या जीवाला धोका, झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा बांधवांची मागणी 

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

Leave a Reply