टी व्ही 9 चे या वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे आज पहाटे दुर्देवाने कोरोना मुळे निधन झाले, त्यांच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत,याची सर्वच हॉस्पिटल्सनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.पांडुरंगच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे असे देखील सुळे यावेळी म्हणाल्या.
पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं करोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड केअर रुग्णायात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडत चालली असताना खासगी रुग्णालयात त्यांना उपचार घेता यावेत यासाठी पुण्यातील पत्रकारांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ते आपल्या सहकारी मित्राचा जीव वाचवू शकले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत वेळेत सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने पांडुरंग यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने केला आहे.
रायकर कुटुंबाला हातभार लागावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेल्फेअर फंडाच्या वतीने पाच लाख रुपये मदत खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर करत पक्षाच्या वतीने त्यांनी पांडुरंगला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Pune: Journalist Pandurang Raykar, who tested COVID19 positive, dies; family alleges lack of care at govt COVID centre
"There's chaos, doctors aren't trained. They made centres worth crores but couldn't arrange cardiac ambulance to shift him, that's why he died," says his sister pic.twitter.com/LAHhBfC1Sm
— ANI (@ANI) September 2, 2020